
सातारा - देशातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठाने भारतातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती सुरू केली आहे. सोमरव्हिले या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीत शिक्षणाची सर्व फी, जेवण खर्चासह अनेक सुविधा मोफत दिल्या जात आहेत.