'कृष्णा'च्या सभासदांनी मोठ्या मताधिक्याने हस्तक्षेपाचा डाव लावला उधळून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'कृष्णा'च्या सभासदांनी मोठ्या मताधिक्याने हस्तक्षेपाचा डाव लावला उधळून

'कृष्णा'च्या सभासदांनी मोठ्या मताधिक्याने हस्तक्षेपाचा डाव लावला उधळून

कऱ्हाड : अनेक राजकीय लोकांनी कृष्णा कारखान्यात (krushna suger factory) हस्तक्षेप करुन राजकीय अड्डा बनवण्याचे षडयंत्र रचले होते. मात्र सुज्ञ सभासदांनी हा डाव मोठ्या मताधिक्याने उधळुन लावला, अशी प्रतिक्रीया अतुल भोसले (atul bhosale) यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या विजयानंतर दिली. (krishna-sugar-factory-election-2021-final-result)

भोसले म्हणाले, कृष्णा कारखाना निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा (bhosale sahakar panel) एकतर्फी विजय होण्याच्या मार्गावर आहे. सर्वसामान्य सभासदांनी, ज्यांच्या वाडवडिलांनी ही संस्था स्थापन केली, त्यांनी आमच्या पॅनेलला साथ दिली. डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन प्रामाणिपणे काम करणारा एक सच्चा माणूस म्हणून त्यांना उचलुन धरले. अनेक राजकीय लोकांनी कृष्णा कारखान्यात राजकीय हस्तक्षेप करुन राजकीय अड्डा बनवण्याचे षडयंत्र रचले. मात्र, सुज्ञ सभासदांनी हा डाव मोठ्या मताधिक्याने उधळुन लावला. कृष्णेच्या संघर्षाच्या राजकारणातील सर्वात मोठा दैदिप्यमान आमचा विजय केलेला आहे. त्यामुळे सभासदांच्या अपेक्षाला खरे ठरवण्याचे काम आम्ही भविष्यकाळात करणार आहोत. कृष्णाचा पूर्वी सर्व बाबतीत उच्चांक होता. तोच उच्चांक करण्याचे काम पाच वर्षात आम्ही ताकदीने करणार आहोत.

हेही वाचा: आंबोली धबधब्याजवळ कोसळला मोठा दगड

टॅग्स :Satara