विरोधक सत्तेवर येऊन सभासदांचं काय भलं करणार?; डॉ. भोसलेंचा घणाघात

Dr. Suresh Bhosale
Dr. Suresh Bhosaleesakal

इस्लामपूर : गेल्या सहा वर्षांपूर्वी आम्ही प्रतिकूल परिस्थितीत कृष्णा कारखान्यात (Krishna Sugar Factory Election) सत्तेवर आलो. पण, सर्व संकटांवर मात करत आज आम्ही कृष्णा कारखाना मजबूत स्थितीत आणला. याउलट पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र कारखाना डबघाईस आणला होता. असे विरोधक पुन्हा सत्तेवर येऊन सभासदांचे काय भले करणार, अशा शब्दांत कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले (Co-operation panel leader Dr. Suresh Bhosale) यांनी विरोधकांचा समाचार घेतला. (Krishna Sugar Factory Election Dr. Suresh Bhosale Criticizes The Opposition In Islampur Satara Political News)

Summary

विरोधक निवडणूक आली की कृष्णा हॉस्पिटलचा मुद्दा प्रचारात घेतात. पण, कृष्णा हॉस्पिटल ही आरोग्यसेवा देणारी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्‍वाची संस्था असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.

येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या (Jayawantrao Bhosale Co-operation Panel) प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातील उमेदवार संजय पाटील, जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भगवान पाटील, आनंदराव पाटील, सुनील पाटील, केदार पाटील, युवराज जाधव, शहाजी पाटील, संदीप पाटील यांची उपस्थिती होती. डॉ. भोसले म्हणाले, " विरोधक निवडणूक आली की कृष्णा हॉस्पिटलचा मुद्दा प्रचारात घेतात. पण, कृष्णा हॉस्पिटल (Krishna Hospital) ही आरोग्यसेवा देणारी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्‍वाची संस्था आहे. कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलने भरीव कामगिरी केली आहे. पण, विरोधक असणारे आमचे डॉक्टर बंधू यांनी एका तरी कोरोना रुग्णावर उपचार केले का?

Dr. Suresh Bhosale
..तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायच्या कशा?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल

चांगल्या चाललेल्या संस्थांवर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरा उद्योग नाही. तर दुसऱ्या विरोधकांच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती सर्व सभासदांना आहेच, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संपत खांबे, शशिकांत पाटील, युवराज जाधव, विश्वासराव पाटील, जयराज पाटील, विजय खांबे, सुनीता संकपाळ, संगीता कांबळे, नारायण पाटील, एम. जी. पाटील, महेश पाटील, अर्जुन जाधव, संतोष जाधव, माणिक मोरे, रजनीकांत मोरे, बाळासाहेब पाटील, श्री. शैलेश पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत देसाई आदींसह सभासद उपस्थित होते.

Krishna Sugar Factory Election Dr. Suresh Bhosale Criticizes The Opposition In Islampur Satara Political News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com