

स्वप्नील शिंदे
सातारा: शिवसागर जलाशय, वासोटा किल्ला, वजराई- ठोसेघर धबधब्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जंगल परिसरात पावसाळ्यात जळवा आढळतात; परंतु आता या जळवांनी कृष्णा आणि वेण्णा नदीच्या काठालाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. कण्हेर धरणापासून संगममाहुलीपर्यंतच्या नदीपात्रात साधारण सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात, तर अन्यत्रही त्यांचा कमी- अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे प्राणिशास्त्र अभ्यासकांच्या पाहणीत आढळले आहे. त्यामुळे केवळ जंगल परिसरात आढळणाऱ्या जळवांनी आता नदीपात्रांच्या गावांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. यावर तातडीने उपाय न शोधल्यास त्याचा परिणाम नागरिक आणि जनावरांच्या आरोग्यावर होणार आहे.