शेतकऱ्यांना (Farmers) शेतीतील बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, त्यांनी आधुनिक तंत्राद्वारे शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवावे, या हेतूने माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी कऱ्हाडला १८ वर्षांपूर्वी कृषी प्रदर्शन सुरू केले.
कऱ्हाड : येथील शेती उत्पन्न बाजार समितीतर्फे (Sheti Utpanna Bazar Samiti) शासनाचा कृषी, पणन विभाग, सातारा जिल्हा परिषद, जिल्हा बॅँक व अन्य विभागांच्या सहकार्याने येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी औद्योगीक व पशुपक्षी प्रदर्शनाचे (Karad Krushi Pradarshan) आयोजन केले आहे. आज (शुक्रवारी) त्याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. शनिवारी त्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. प्रदर्शनात यंदा सर्वात उंच खिलार बैलाचे आकर्षण राहणार आहे.