

सातारा : रक्षाबंधन म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते भाऊ-बहिणीचं हळवं नातं. मात्र, सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कुटुंबापासून दूर राहून हा सण साजरा करावा लागतो. या ‘फौजी भावांची’ हीच उणीव जावली तालुक्यातील कुडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी आपल्या प्रेमाने भरून काढण्याचा प्रयत्न केला.