कऱ्हाड - पुणे-बंगळुरु महामार्गावरील कोल्हापुर नाका ते नांदलापुर दरम्यानच्या उड्डाणपुल उभारणीचे काम अंतिम टप्यात आहे. पुलावर सेगमेंट बसवण्यासाठी त्याच्यावर गर्डर बसवण्यात आले आहेत. पुलाच्या सेगमेंटचे काम झाल्याने आता आजपासुन ढेबेवाडी फाट्यावरील आणि त्यानंतर कोल्हापुर नाका येथील गर्डर खाली उतरण्याची कार्यवाही ठेकेदार कंपनीकडुन सुरु करण्यात येणार होती.