landslide
sakal
सातारा - जिल्ह्यातील सहा मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे घाट रस्ते सध्या दरडी कोसळणे आणि भूस्खलनाच्या तीव्र छायेत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या घाटांमध्ये दुर्घटना घडतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यावर कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी प्रवासी सुरक्षेची उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून प्रशासन हात झटकण्यापेक्षा या घाटांवर तातडीने ‘आपत्ती सौम्यीकरण आराखडा’ राबवण्याची गरज आहे.