विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, विविध कोविड केअर सेंटरची करणार पाहणी

सिद्धार्थ लाटकर
Friday, 28 August 2020

महाराष्ट्र विधानसभेचे  विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस हे आज (शुक्रवार) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सातारा जिल्ह्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी काेणत्या उपयाययाेजना केल्या. याबाबतची माहिती फडणवीस घेणार आहेत.

सातारा  : महाराष्ट्र विधानसभेचे  विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस हे आज (शुक्रवार) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सातारा जिल्ह्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी काेणत्या उपयाययाेजना केल्या. याबाबतची माहिती फडणवीस घेणार आहेत.

आज (शुक्रवार) दुपारी तीन वाजता फडणवीस यांचे जिल्हा रुग्णालय, सातारा येथे आगमन हाेईल. ते तेथील जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटरला भेट देतील. दुपारी साडे तीनला मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे समवेत चर्चा होईल. त्यानतंर सायंकाळी चार वाजता मोटारीने इस्लामपूर जि. सांगलीकडे प्रयाण करतील. तसेच सायंकाळी सव्वा सहा वाजता कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे आगमन व कोविड केअर सेंटरला भेट देतील.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly Denvendra Fadnavis will arrive in Satara today