निवडणुकीतील घोषणा हवेत! राजकीय हेवेदाव्यांत नेत्यांचं विकासाकडं दुर्लक्ष

zilla parishad satara
zilla parishad sataraesakal

सातारा : सहकारमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्या कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात (Karad North Assembly Constituency) येणारा वर्णे गट राजकीयदृष्ट्या महत्त्‍वाचा मानला जातो. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Satara) गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २०१७ मध्ये भाजपकडून (BJP) मनोज घोरपडे (Manoj Ghorpade) निवडून आले. त्याआधी २०१२ मध्‍ये त्यांच्या मातोश्री मंगल घोरपडे या निवडून आल्या होत्या. त्यामुळे, गेली सलग १० वर्षे वर्णे गटाची सत्ता घोरपडे कुटुंबीयांकडे आहे. जिल्हा नियोजन समितीवर (District Planning Committee) सदस्य असल्याने गटाचा कायापालट करण्याची मतदारांची अपेक्षा होती. मात्र, सर्वसमावेशक विकास व भरीव कामात गट मागे पडल्याचे चित्र आहे. (Leaders Neglect Development Of Satara District Due To Politics Satara Political News)

Summary

जिल्हा परिषदेच्या निवडणुका आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. कोरोनाचा सव्वा वर्षांचा काळ वगळता उर्वरित कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या मतदारसंघात मतदारांची विकासात्मक अपेक्षापूर्ती करता आली का, याचा घेतलेला मागोवा...

वर्णे गटात सुमारे २४ हजारांहून अधिक मतदार असून, २९ गावांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत हा गट कऱ्हाड उत्तर व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे. त्यामधील चार ते पाच ग्रामपंचायतींवर घोरपडे यांच्या गटाची सत्ता आहे, तर काही ग्रामपंचायतींवर (Gram Panchayat) आमदार शिवेंद्रसिंहराजे (MLA Shivendrasinharaje Bhosale) गटाबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली आहे. या सत्ता स्थापनेत शिवेंद्रसिंहराजे गटाने राष्ट्रवादीच्या मूळ (NCP) गटाला वाऱ्यावर सोडल्याचे दिसते. वर्णे गटातील अपशिंगे गणात संजय घोरपडे हे मनोज घोरपडे गटाचे उमेदवार निवडून आले, वर्णे गणात कांचन काळंगे या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या. त्यामुळे, कऱ्हाड उत्तर मतदारसंघावर (Karad North constituency) पालकमंत्र्यांचे वर्चस्व असले तरी वर्णे गटावर सलग दहा वर्षे सत्ता अबाधित ठेवण्यात मनोज घोरपडे यशस्वी झालेले दिसतात.

zilla parishad satara
'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या येण्याने नाखूष असतात'

मनोज घोरपडे जिल्हा नियोजन समितीवरही सदस्य असल्याने निधींची तरतूद करून गटात पशुवैद्यकीय दवाखाना, आरोग्य उपकेंद्र (Health Subcentre), सुस्थितीतील रस्ते, सभामंडप व इतर प्राथमिक सोयी-सुविधा देण्याची मतदारांची अपेक्षा होती. त्यातील काही विकासकामांचा पाठपुरावा करून ती कामे झालीही आहेत. मात्र, गटात उठावदार व भरीव काम झाल्याचे दिसत नाही. अंगापूर व वेणेगावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सतत पाठपुरावा केल्याचे घोरपडे गटाकडून सांगितले जात आहे. गटात सलग दहा वर्षे सत्ता असल्याने गटाचा विकास होणे अपेक्षित होते. परंतु, सोयी-सुविधांअभावी एवढ्या मोठ्या मतदारांचा गट दुर्लक्षित राहिला असून प्रतिस्पर्धी ग्रामपंचायती असणाऱ्या गावांच्या विकासकामात दुर्लक्ष केल्याचा आरोप मतदार करत आहेत. विकासापेक्षा राजकीय हेवेदावे करण्यात राजकीय नेते अडकल्याने विकासाभिमुख कामात गट मागे दिसतो. सर्वसमावेशक विकासात अपेक्षापूर्ती न झाल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

zilla parishad satara
बंडातात्या फरार झालेत! हे साफ खाेटं आहे

वर्णे गटात गेली दहा वर्षे सत्ता असूनही गटाचा कायापालट करण्यात मनोज घोरपडे अपयशी ठरलेत. विकासाची कोणतीही भूमिका नसल्याने मतदारांची घोर निराशा झाली आहे. कोरोनाच्या काळातही सदस्यांनी एकही कोरोना सेंटर उभारले नसून पाठपुरावाही केला नाही.

-धनंजय कदम-शेडगे, अध्यक्ष, सातारा जिल्हा सहकार बोर्ड

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नव्याने पशुवैद्यकीय दवाखाना व इतर सोयी-सुविधा झाल्या नाहीत. हा गट दोन विधानसभा मतदारसंघात असल्याने विकासात मागे राहिला आहे. गेली दोन दशके जिल्हा परिषद सदस्यांच्या कुटुंबीयांकडे सत्ता असूनही, गटाचा सर्वांगीण विकास करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

-राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

zilla parishad satara
नगराध्यक्षांविरोधात 'जनशक्ती' आक्रमक

वर्णे गटात गेल्या पाच वर्षांत करोडो रुपयांची विकासकामे केली असून, नुकताच बोरगाव ते नांदगावदरम्यान अडीच कोटी रुपयांचा रस्ता केला आहे. तसेच, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करून गटाचा सर्वांगीण विकास केला आहे.

-संजय घोरपडे, पंचायत समिती सदस्य, अपशिंगे गण

Leaders Neglect Development Of Satara District Due To Politics Satara Political News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com