esakal | तांबवे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांत धास्ती
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

तांबवे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांत धास्ती

sakal_logo
By
अनिल बाबर

तांबवे (सातारा): गावातील मधले टेक नावाच्या शिवारात काल सकाळी- सकाळी आठ वाजताच बिबट्याचा मुक्त संचार तेथील शेतकऱ्यांना पाहायला मिळाला. एका जनावरांच्या शेडमध्ये डोकावताना तेथील शेतकऱ्याला बिबट्या दिसला. त्यांनी कोणतीही हालचाल न करता त्याला जाऊन दिला. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: कऱ्हाडमधील तांबवे गावाची पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

तांबवे गावातील अप्पासाहेब पाटील हा शेतकरी सकाळी सातच्या सुमारास जनावरांच्या शेडमध्ये होता. यानंतर काही वेळाने याच शेडमध्ये जवळच बिबट्या डोकावत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांची हालचाल झाल्याचा आवाज येताच बिबट्या उसाच्या शेतात निघून गेला. दरम्यान पाटील यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्याच्या मुक्त संचाराचे चित्रीकरण केले आहे. या प्रकाराने शिवाराच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या परिसरात शेतकऱ्यांना जाण्याचे टाळले आहे. तांबवे परिसरात चार बिबट्यांचा वावर असल्याची चर्चा आहे. मागील आठवड्यात गावात येऊन त्याने कुत्रे ठार मारले होते. त्यानंतर शिवारातील तीन ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्यांचे दर्शन झाले आहे. वनविभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी तांबवे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली.

हेही वाचा: तांबवे गावात चौबाजुने शिरले पाणी; ग्रामस्थ अ़डकले

हल्ला केल्यावरच पिंजरा लावू...

तांबवेतील बिबट्याची माहिती वन विभागाला देऊन त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर एखाद्या नागरिकावर हल्ला केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, असे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे तांबवे ग्रामस्थ संतापले आहेत. बिबट्याने एखाद्याचा बळी घेतल्यानंतरच वनविभागाला जाग येणार का? असा सवालही तांबवे ग्रामस्थांनी केला आहे.

loading image
go to top