esakal | लसीकरण वेगाने होण्यासाठी लसीचा पुरवठा करा; कऱ्हाडच्या नगराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Rohini Shinde

लसीकरण वेगाने होण्यासाठी लसीचा पुरवठा करा; कऱ्हाडच्या नगराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोनाच्या (Corona) काळात कऱ्हाडला पूर्ण क्षमेतेने लसपुरवठा व्हावा, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण वेगाने होण्यासाठी लसीचा पुरवठा करा, अशी मागणी येथील नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र (Letter) लिहून केली आहे. (Letter From Mayor Rohini Shinde To Chief Minister Uddhav Thackeray For Vaccination)

नगराध्यक्षा शिंदे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, सर्वत्र कोरोनाची स्थिती बिकट आहे. त्याचा ताण शासन, आरोग्य यंत्रणांना बसतो आहे. बाधित रुग्णांना हॉस्पिटल, बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध नाहीत. अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. अशा स्थितीवर मात करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण गरजेचे आहे. त्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावेत. सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लस प्रत्येक आरोग्य केंद्रावर उपलब्ध करून देण्यात यावा. त्याबाबत शासनाने सर्व अधिकार वापरून सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी. या गंभीर संकटात सरकारने नागरिकांचे पालक म्हणून काम करावे.

रुग्णांची लूट केल्यास माझ्याशी गाठ; भाजपच्या आमदाराचा खासगी हॉस्पिटल्सना इशारा

Letter From Mayor Rohini Shinde To Chief Minister Uddhav Thackeray For Vaccination