प्रतिक गुरव खून प्रकरणाचा तपास कोरेगाव पोलिसांनी खोलवर जाऊन केलेला नाही. केवळ ओंकार जाधव या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.
कोरेगाव : ल्हासूर्णे (ता. कोरेगाव) येथील प्रतीक राजेंद्र गुरव खूनप्रकरणाचा (Murder Case) तपास संशयास्पद झाल्याचे निदर्शनास येत असून, कोरेगाव पोलिसांनी (Koregaon Police) गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती वाढवून त्यात अन्य चार जणांना सहआरोपी करावे, अशी मागणी अखिल गुरव समाज संघटनेने (Gurav Samaj Organization) केली असून, या मागणीनुसार कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.