
सातारा : येथील लिंगायत समाजाची स्मशानभूमी ‘रुद्रभूमी’ विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच दिली. महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ आणि लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मंत्री शिवेंद्रसिंहराजेंची नुकतीच भेट घेण्यात आली, तसेच यावेळी रुद्रभूमीच्या विकासाबाबत प्रकाश गवळी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.