लोणंद : खंडाळ्याच्या सभापतिपदी अश्विनी पवार

पंचायत समितीमध्ये बिनविरोध निवड; पारगाव ग्रामस्थांत आनंद
khandala panchayat samiti
khandala panchayat samitiSakal
Updated on

लोणंद : खंडाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी विपुल पवार यांची आज बिनविरोध निवड झाली,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.

पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडीसाठी आज सकाळी साडेअकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावली होती. या वेळी बैठकीसाठी माजी सभापती राजेंद्र तांबे व मकरंद मोटे, उपसभापती वंदनाताई धायगुडे -पाटील, सदस्या अश्विनी पवार, शोभा जाधव व चंद्रकांत यादव उपस्थित होते. सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अश्विनी पवार, तर भाजपचे चंद्रकांत यादव यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या वेळेत यादव यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सभापतिपदी अश्विनी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जाधव यांनी घोषित केले.या कामी गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांनी सहकार्य केले.

khandala panchayat samiti
Rain Update: राज्यात अवकाळीचा तडाखा कुठे? काय झालाय परिणाम?

पंचायत समितीत एकूण सहा सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, काँग्रेसचे एक, भाजपचे एक व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. ज्‍येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांच्यानंतर पवार यांच्या माध्यमातून बऱ्याच कालावधीनंतर पारगावला सभापतिपद मिळाले आहे. त्यामुळे पारगाव ग्रामस्थांना आनंद झाला आहे.

सभापती पवार यांचे दत्तानाना ढमाळ, नारायणराव पवार,राजेंद्र तांबे, मकरंद मोटे, चंद्रकांत यादव, बाळासाहेब जाधव, भानुदास यादव आदींनी सत्कार करून अभिनंदन केले.

आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिलांपर्यंत शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोचवून निश्चितच लोकहितासाठी उरलेल्या कालावधीत जोमाने काम करणार आहे.

- अश्विनी पवार, सभापती, खंडाळा पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com