ग्रामस्थांनाे! महिनाभर आठवडा बाजार राहणार बंद

रमेश धायगुडे
Sunday, 28 February 2021

शहरातील मंगल कार्यालय मालकांनीही कायदेशीर लेखी परवानगीशिवाय विधी करू नयेत. कोरोनाच्या नियमावलीचा भंग केल्यास कडक कारवाईस सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी.

लोणंद (जि. सातारा) : कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता शहरातील नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा कडक कारवाईस सामोरे जावे लागेल. दरम्यान, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये 31 मार्च 2021 पर्यंत आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकळे यांनी दिली.
 
कोरोना प्रतिबंधात्मक सर्व बाबींचे कटाक्षाने पालन करावे. कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता शहरातील सर्व नागरिकांनी दक्ष राहावे. नगरपंचायत व पोलिस ठाणे यांच्या वतीने मुख्याधिकारी ढोकळे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या नियोजनानुसार शहरात कारवाई पथक कार्यरत झाले आहे. या पथकाद्वारे शहरात विनामास्क फिरणाऱ्या सुमारे 45, तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या 10 जणांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. 

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील नागरिकांनी शहरात विनामास्क फिरू नये, तसेच व्यापारी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सॅनिटायझरचा वापर करावा. शहरात अनावश्‍यक फिरू नये, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये. सर्व व्यापारी, फळेभाजीपाला विक्रेते यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन तत्काळ कोरोनाची टेस्ट करून त्याचा रिपोर्ट स्वतःजवळ ठेवावा. ही टेस्ट विनामूल्य करण्यात येत आहे, तसेच शहरातील मंगल कार्यालय मालकांनीही कायदेशीर लेखी परवानगीशिवाय विधी करू नयेत. कोरोनाच्या नियमावलीचा भंग केल्यास कडक कारवाईस सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी. नागरिकांनी याकामी सहकार्य करून होणारी कटू कारवाई टाळावी, असे आवाहनही मुख्याधिकारी ढोकळे यांनी केले आहे.

नवनिर्वाचित सरपंच पतीचे अपहरण; बँकेच्या निवडणुकीवरुन राजकीय घमासान

National Science Day 2021 : किल्ले अजिंक्यता-यावरुन रेडिओ संदेशांची होणार देवाण-घेवाण

खळबळजनक घटना: आई वडिलांनी मुलीचा मृतदेह परस्पर पुरला 

Video पाहा : आता काेल्हापूर, सांगलीही गृहराज्यमंत्र्यांचे टार्गेट 

आपला पैसा आपल्या कामी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonand Market Will Remain Closed Till 31 March 2021 Satara Marathi News