
लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ‘एक धाव आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत येथे आयोजित पाच किलोमीटर अंतराच्या ‘लोणंद मॅरेथॉन २०२५’ स्पर्धेत सुमारे ८०० पेक्षा अधिक लोणंदकर युवक, युवती व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत धावले.