कृषी केंद्र, बॅंक बंदीचा शेतकऱ्यांना फटका; खरिपातील बियाणे खरेदीवर परिणाम!

Farmer
Farmeresakal

तारळे (सातारा) : जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काढलेल्या आदेशात कृषी सेवा केंद्रे (Agricultural Service Center) सुरू करून शेतकऱ्यांना (Farmer) खरिपाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे. आधीच टाळेबंदीमुळे (lockdown) लोकांच्या हातात पैसे नाहीत. जे काही आहेत ते बॅंकेत. परंतु, बॅंका (Bank) बंद असल्याने शेतकऱ्यांना पैसेही काढता येत नाहीत. त्यामुळे बियाणे-खते खरेदीची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बॅंका सुरू करण्याची मागणी होत आहे. (Loss Of Farmers Due To Closure Of Banks And Agricultural Service Center At Tarle)

Summary

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाच एप्रिलपासून अंशतः निर्बंध सुरू झाले. त्यात सुधारणा करत 25 मे रोजी कडक निर्बंध घालण्यात आले.

कोरोना महामारीच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाच एप्रिलपासून अंशतः निर्बंध सुरू झाले. त्यात सुधारणा करत 25 मे रोजी कडक निर्बंध घालण्यात आले. या निर्णयांमुळे अनेकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. त्यातच खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने साथ दिल्याने मशागती पूर्णत्वास गेल्या आहेत. शेतकरी पेरण्याच्या तयारीत आहे. मागील आठवड्यात बी- बियाणे, खते दुकाने बंद राहिल्याने खरेदी करता आली नाही. त्याआधी खतांच्या वाढलेल्या किमतीने बळिराजा पुरता बेजार झाला आहे. त्यात बॅंक बंदचा निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Farmer
झाडं वाचवली तरच माणसं वाचतील; राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त बाळकृष्ण मालेकरांचं मत

कृषी सेवा केंद्रे सुरू झाली. खरीप हंगामासाठी ठेवलेले पैसे बॅंकेत आहेत. मात्र, बॅंका बंद आहेत. त्यामुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. पैसे मिळत नसल्याने दुकाने उघडी असूनही बियाणे, खते घेता येत नाहीत. वेधशाळेने मॉन्सून वेळेत दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बळिराजाची पेरणीच्या तयारीत असतानाच पैसे नसल्याने मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे तातडीने बॅंका सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. खरिपाच्या तोंडावर खेडोपाडी लोकांची अवस्था सांगताही येईना आणि सहनही होईना, अशी झाली आहे.

Farmer
माणगंगा नदीपात्रातील तब्बल 800 वर्षांपूर्वीच्या स्नानकुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

एसीत बसून लॉकडाउनचा निर्णय घेताना शेतकऱ्यांचा विचार केलेला दिसत नाही. बॅंका बंद असतील, तर कृषी केंद्रे सुरू करून फायदाच नाही. त्यात बदल करून लोकांना पैसे मिळण्याची सोय तातडीने केली पाहिजे.

-प्रवीण काटे, शेतकरी, आवर्डे

Loss Of Farmers Due To Closure Of Banks And Agricultural Service Center At Tarle

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com