esakal | आमच्यावर आठ तासांपेक्षा जास्त काम लादू नका; आरोग्य कर्मचाऱ्यांचा थेट इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Maan Taluka Health Association

आमच्यावर शासन नियमानुसार आठ तासांपेक्षा जास्त काम लादण्यात येवू नये.

आमच्यावर आठ तासांपेक्षा जास्त काम लादू नका

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : सततच्या नियमित कामांचा ताण असून सुध्दा कोविड (Coronavirus) संदर्भातील कामे करत आहोत. मात्र, आम्हाला कोरोना उपचार केंद्र व समर्पित कोरोना आरोग्य केंद्रात काम लादण्यात येवू नये आम्ही ते करणार नाही, असा स्पष्ट इशारा माण तालुका आरोग्य संघटनेच्यावतीने (Maan Taluka Health Association) देण्यात आला. याबाबतचे लेखी निवेदन संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, तालुका वैद्यकीय विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक व सेविका हे आरोग्य उपकेंद्र स्तरावर काम करत असताना उपकेंद्रांतर्गत नियमित असणारी कामे अनेक समस्यांमुळे उद्दिष्टाप्रमाणे पूर्ण होत नाहीत. उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने वरिष्ठ स्तरावरून वारंवार विचारणा होत असते. असे असताना शासनाकडून कोविड लसीकरण व कोविड तपासणी, आयसीएमआर ऑनलाइन करणे, हाय रिस्क व लो रिस्क याद्या तयार करुन त्यांची कोविड तपासणी करणे. कोविड रुग्णांना कोविड सेंटरला पाठविणे व औषधोपचार करणे ही जादाची कामे करत आहोत. मार्च २०२० पासून एकही सुट्टी न घेता आम्ही कामकाज करत आलो आहोत. यासंबंधी आढावा नियमितपणे आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.

हेही वाचा: चर्चा तर होणारच! जिल्हा बँकेचं राजकारण तापलं; BJP-NCP आमदार एकत्र?

Maan Taluka Health Association

Maan Taluka Health Association

या सर्व कामकाजाचा आमच्यावर ताण असून आम्हाला कोविड सेंटरला अधिकचे काम देवू नये. कोविड सेंटरमध्ये काम करण्याचे शिक्षण आमचे झाले नसून त्यामुळे ताणतणाव निर्माण झाला आहे. तरी आम्हाला कोविड सेंटरला काम देण्यात येवू नये. आमच्यावर शासन नियमानुसार आठ तासांपेक्षा जास्त काम लादण्यात येवू नये. इतर विभागप्रमाणे आम्हालाही शासकीय सुट्ट्या मिळाव्यात. तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोविड सेंटरला काम करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सदरचे निवेदन देतेवेळी अनिल काशिद, अधिक गंबरे, महादेव गंबरे, शिवराम हुलगे, गणेश लंगडे, राजू जाधव, श्रीमती दराडे, श्रीमती खाडे, श्रीमती उगलमोगले, श्रीमती शिंदे, श्रीमती साबळे, अस्लम शेख आदी उपस्थित होते.

loading image
go to top