Lok Sabha Election 2024 : रथीमहारथींपुढे जयकुमार ठरले भारी; मित्राला माढ्याची उमेदवारी मिळवून रामराजेंना चेकमेट

सर्व शंकाकुशंकांना पूर्ण विराम देत माढ्यातील रथीमहारथींपेक्षा एकच जयकुमार गोरे भारी ठरले आहेत.
madha seat to ranjit singh nimbalkar jaykumar gore lok sabha election 2024 politics
madha seat to ranjit singh nimbalkar jaykumar gore lok sabha election 2024 politicsSakal

दहिवडी : सर्व शंकाकुशंकांना पूर्ण विराम देत माढ्यातील रथीमहारथींपेक्षा एकच जयकुमार गोरे भारी ठरले आहेत. मातब्बरांच्या विरोधाला कात्रजचा घाट दाखवत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यात ते यशस्वी ठरले.

विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक-निंबाळकर व मोहिते पाटील घराणे यांचा कडवा विरोध होता. रामराजे हे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासाठी कमालीचे आग्रही होते.

जर संजीवराजेंना उमेदवारी मिळाली नाही, तर रणजितसिंह यांना सुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही, असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले होते. मोहिते पाटील घराण्याने यंदा आपला माणूस, आपला खासदार ही घोषणा दिली होती. इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.

मात्र, दुसरीकडे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले जीवश्चकंठश्च मित्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी बेरजेचे राजकारण करण्याचा व वरिष्ठांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला होता.

माण तालुक्यात शासकीय विश्रामगृह, तसेच आपल्या निवासस्थानी जयकुमार गोरे हे विविध मान्यवरांशी चर्चा करत होते. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माळशिरसचे आमदार राम सातपुते, मोहिते पाटील यांचे विरोधक उत्तमराव जानकर, पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचा पाठिंबा मिळविण्यात ते यशस्वी झाले होते.

हे सर्व सकारात्मक चित्र पक्षश्रेष्ठींसमोर उभे करण्यात गोरे-निंबाळकर द्वयीला यश आले, तसेच दिल्ली दरबारीसुद्धा गोरे यांनी आपले वजन रणजितसिंह यांच्यासाठी पणाला लावले होते. त्यामुळे रामराजे व मोहिते पाटील यांच्या विरोधाला फाट्यावर मारत पक्षश्रेष्ठींनी रणजितसिंहांना उमेदवारी बहाल केली.

रणजितसिंहांना माढ्याची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्याने आमदार जयकुमार गोरे यांचे साताऱ्यासह सोलापूर जिल्ह्यात राजकीय वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. रणजितसिंह यांच्या प्रचाराच्या नियोजनाची एकहाती धुरा आमदार जयकुमार गोरे यांच्या हातात असणार असल्याने रणजितसिंह यांच्या विजयासाठी आमदार गोरे जिवाचे रान करतील, यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com