Mahabaleshwar Bandh News : महाबळेश्वर उद्या कडकडीत बंद! रंगपंचमीच्या दिवशीच पर्यटकांची होणार कोंडी? पाहा नक्की काय घडलंय?

Mahabaleshwar city bandh news highway work : सुरूर-पोलादपूर महामार्गाच्या कामाला गती नसल्यामुळे महाबळेश्वर नागरिक संतप्त झाले आहेत. निषेधार्थ महिला दिनी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Satara Mahabaleshwar road construction issue

Satara Mahabaleshwar road construction issue

esakal

Updated on

महाबळेश्वर (सातारा) : सुरूर ते पोलादपूर राज्य महामार्गाच्या कामाला वारंवार मागणी करूनही गती मिळत नसल्याने महाबळेश्वरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला (Mahabaleshwar Bandh News) आहे. याच्या निषेधार्थ रविवारी (ता. आठ) महिला दिन व रंगपंचमीच्या दिवशी महाबळेश्वर शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनानंतरही रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही, तर बेमुदत शहर बंद व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

PWD Minister Shivendrasinhraje Bhosale
Pratapgad search and rescue team mission
What are the best places to visit in Mahabaleshwar?
Anushree Markad Dapoli accident news
Marathi News Esakal
www.esakal.com