महाबळेश्वरचा विकास करताना अन्याय करणार नाही - आदित्य ठाकरे

महाबळेश्वरचा विकास करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySakal
Updated on
Summary

महाबळेश्वरचा विकास करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महाबळेश्वर - महाबळेश्वरचा (Mahabaleshwar) विकास (Development) करताना कोणावरही अन्याय (Injustice) होऊ देणार नाही, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितले. मुंबई येथे आज मंत्रालयात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, शहरातील व्यापारी केतन यादव, हेमंत साळवी, ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, संजय बोधले यांच्या शिष्टमंडळाने मंत्री ठाकरे यांची भेट घेतली. प्रथम मंत्री ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या विकासाकडे लक्ष देऊन त्वरित शहराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या वेळी महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांचा सुशोभीकरणाला कोणताही विरोध नाही.

परंतु, बाजारपेठेच्या नियोजनामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आराखडा करावा, अशी मागणी मंत्री ठाकरे यांच्याकडे व्यापारी शिष्टमंडळाने केली. या वेळी मंत्री ठाकरे यांनी महाबळेश्वरकरांची कैफियत ऐकून घेतली. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. शहराचा योग्य विकास करण्यासाठी माझे प्रयत्न असून, त्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार आहे. परंतु, येथील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊनच येथील काम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. वास्तुविशारद जोशी, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याचे आश्वासनही त्यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी विकास आराखड्याच्या नियोजनाच्या कामाला सुरुवात केली होती. वास्तुविशारद जोशी यांनी केलेल्या बाजारपेठेच्या आराखड्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह अनेकांशी संपर्क केला. परंतु, त्याला यश येत नसल्याने अखेर मंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com