
कास : मान्सूनच्या पावसाने महाबळेश्वर तालुक्यात (Mahabaleshwar Tapola Road) अक्षरश: कहर केला असून मुसळधार पावसाने तापोळा विभागाला (Tapola Division) जोडणारा महाबळेश्वर-तापोळा रस्ता वाहून गेला आहे. अनेक रस्त्यांवर दरडी कोसळणे, माती वाहून येणे असे प्रकार झाल्याने या विभागातील जनजीवन ठप्प झाले असून प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.