महाबळेश्वर पालिकेत रंगले "व्हीप वॉर'; विरोधकांचा सभेवर बहिष्कार

महाबळेश्वर पालिकेत रंगले "व्हीप वॉर'; विरोधकांचा सभेवर बहिष्कार
Updated on: 

महाबळेश्वर (जि. सातारा) : "व्हीप वॉर'मुळे गाजलेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे गणपूर्तीअभावी सभा अखेर तहकूब करण्यात आली. दरम्यान, या सभेत गणपूर्तीशिवाय सर्व विषय मंजूर करण्याची तयारी सत्ताधारी गटाने सुरू केल्याने विरोधकांची तारांबळ उडाली आहे.

पालिकेत तीन आघाड्या आहेत. त्यापैकी भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती, तर शिवसेनेचे पाच नगरसेवक विरोधात होते. सध्या राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेचे काही नगरसेवक एकत्र आले आहेत. सभेसाठी एका आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक कुमार शिंदे यांनी आघाडीतील नगरसेवकांना सभेसाठी व्हीप जारी केला. नगरसेवक संदीप साळुंखे यांनीही आपल्या आघाडीतील नगरसेवकांना व्हीप बजावला. शिंदेंच्या आघाडीतील काही नगरसेवक विरोधात गेले आहेत, तर साळुंखेंच्या आघाडीतील काही नगरसेवक हे सत्ताधारी गटात आहेत. दरम्यान, आमदार मकरंद पाटील यांच्याबरोबर चर्चा करून विरोधातील 13 नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 

विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने पालिका वर्तुळात खळबळ माजली होती. विरोधकांनी आपला निर्णय बदलावा म्हणून कुमार शिंदे यांच्या वतीने नगरसेवक युसूफ शेख हे विरोधकांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु व्हीप प्रथम मागे घ्या त्यानंतर आम्ही चर्चा करू, अशी विरोधकांनी भूमिका घेतल्याने व विरोधकांनी केलल्या मागणीप्रमाणे व्हीप मागे घेण्यास कुमार शिंदे यांनी नकार दिल्याने सभेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, बुधवारी (ता.31 मार्च) तहकूब करण्यात आलेली सभा आज (एक एप्रिल) घेऊन सर्वच विषय मंजूर करण्याची तयारी नगरसेवक कुमार शिंदे यांनी चालविली आहे. त्यामुळे नगरसेवक आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

VIDEO : महाबळेश्वरसह जावळी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; विजेच्या कडकडाटांसह गारांची बरसात 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti warning to sugar factories
Krishna Sugar Factory Karad
High Court Decision on Anil Desai and Rajendra Rajpure Election Eligibility Creates Legal Uncertainty for Seven Other Directors
Sonal Sonawane Success Story From Losing Her Husband to Building a Future for Two Children Through Courage and Determination
Marathi News Esakal
www.esakal.com