महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु

महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु
Updated on: 

महाबळेश्वर (जि. सातारा) : महाबळेश्वर येथील एकाला २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता फिर्यादीकडून तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये घेतल्याप्रकरणी मिलिंद किणी (रा. पुणे) व संजय बालिका (रा.औरंगाबाद) यांच्या विरुद्ध दोन महिन्यांपूर्वी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील मिलिंद किणी यास पोलिसांनी पिंपरी चिंचवड मधून ताब्यात घेतले.

नऊ एप्रिल २०१९ ते ०९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मिलिंद किणी व संजय बालिका यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी सुनील भाऊ ढेबे (रा. हॉटेल कृष्णा, महाबळेश्वर) यांना २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता सुमारे तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये घेऊन कर्ज मंजूर न करता व घेतलेले पैसे परत न दिल्याने फिर्यादी सुनील भाऊ ढेबे यांनी आॅक्टोबर महिन्यामध्ये महाबळेश्वर पोलीस ठाण्यात मिलिंद किणी (रा. प्रेमलोक पार्क चिंचवड, पुणे) व संजय बालिका (रा. औरंगाबाद) यांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

अखेरच्या श्वासापर्यंत विलासकाकांनी घेतली शेतक-यांची काळजी  

महाबळेश्वर पोलिसांनी कलम ४२०,३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला होता. पोलिस निरीक्षक बी.ए कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप साबळे, रमेश काळे, श्रीकांत कांबळे यांच्या पथकाने फसवणुकीतील मिलिंद किणी यास पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याच्या मदतीने राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.

Edited by : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com