साताऱ्यातील "हे' महंत अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी देणार 51 लाख दक्षिणा

रूपेश कदम 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शांतिगिरीजी महाराजांचे गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात तीन मोठे आश्रम आहेत. चार वर्षांपूर्वी महाराजांना जुना आखाडामधील सर्व महंतांनी मिळून आंतरराष्ट्रीय महामंत्री हे पद देऊन गौरविले आहे.

दहिवडी (जि. सातारा) : अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माणच्या कोनशिला स्थापना सोहळा येत्या बुधवारी (ता. पाच) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मलवडी (ता. माण) गावचे सुपुत्र व हरिद्वार येथील जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांना देण्यात आले आहे. श्री शांतिगिरीजी महाराजांनी मंदिरासाठी 51 लाख रुपये दक्षिणा दान म्हणून देण्याचे घोषित केले आहे. 

शांतिगिरीजी महाराजांचे गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात तीन मोठे आश्रम आहेत. महाराजांनी सातारा शहरामध्ये सात वर्षांपूर्वी दवाखान्यातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी 20 रुपये प्रतिडबा याप्रमाणे अन्नपूर्णा आहार योजना सुरू केली आहे. याव्यतिरिक्त गुजरातमध्ये मोठी गोशाळा उभारून इतरत्र भटकणाऱ्या गाईंची सेवा ते मनोभावे करत आहेत, तसेच मलवडी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. चार वर्षांपूर्वी महाराजांना जुना आखाडामधील सर्व महंतांनी मिळून आंतरराष्ट्रीय महामंत्री हे पद देऊन गौरविले आहे. श्रीराम मंदिर निर्मितीसाठी श्री शांतिगिरीजी महाराजांनी 51 लाख रुपये दक्षिणा दान म्हणून देण्याचे घोषित केले आहे. 

सात मोठ्या महंतांना निमंत्रित 

गुजराजमधील सात मोठ्या महंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांचा समावेश आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी... या गीताला स्मरून अशीही मदत - 

ब्युटीपार्लर व्यावसायिकांना हवी 15 हजार भरपाई, प्रांतांकडे साकडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahant From Satara Will Donate Rs 51 Lakh For The Shriram Temple In Ayodhya