esakal | जिल्ह्यात या, मग कळेल; फडणवीस, पाटलांना गृहराज्यमंत्र्यांचं चोख प्रत्युत्तर I Lakhimpur Kheri
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai
केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी कायदे केले आहेत, त्याविरोधात उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

जिल्ह्यात या, मग कळेल; फडणवीस, पाटलांना गृहराज्यमंत्र्यांचं चोख प्रत्युत्तर

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : विरोधक जर सातारा जिल्ह्यात आले, तर त्यांना बंदला प्रतिसाद आहे की नाही हे कळेल. आज सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी 100 टक्के बंद पाळला. विरोधकांना केवळ महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करणे, महाविकास आघाडीने एखादा विषय हातात घेतला, की तो कशा पध्दतीने हाणून पाडता येईल एवढेच काम आहे. विरोधकांचा त्याला विरोध असेल तर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जो महाराष्ट्रातील जनतेने बंदला पाठिंबा दिला आहे, तो त्यांना मान्य नाही, असा त्याचा अर्थ काढावा लागेल, अशी टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी कऱ्हाडात (जि. सातारा) लगावला.

महाराष्ट्र बंदच्या (Maharashtra Band) पार्श्वभूमीवर मंत्री देसाई यांनी आज कऱ्हाड शहरातील बंदोबस्ताची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले आहेत, त्याविरोधात उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. ते आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारमध्ये एका राज्यमंत्र्यांच्या मुलाकडून नऊ शेतकऱ्यांना गाडी अंगावर घालून चिरडण्यात आले. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासून सातारा जिल्ह्यामध्ये पोलिस बंदोबस्ताची मी पाहणी करत आहे. शांततेच्या मार्गाने लोकांनीही बंद पाळला आहे. दुपारनंतर काही ठिकाणी थोड्या प्रमाणात दुकाने सुरु झाली आहेत. मात्र, सकाळी पूर्णपणे बंदमध्ये सहभागी होवून जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जी शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतलीय. केंद्रातल्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले आहे, त्यांचा महाराष्ट्रातून, सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्तपणे निषेध पाळण्यात आला आहे.

हेही वाचा: 'देशात इंग्रजांपेक्षाही अमानुष प्रकार; शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न'

विरोधी पक्षनेते फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बंदला प्रतिसाद मिळालेला नाही, बंद फसला आहे, या वक्तव्यावर मंत्री देसाई म्हणाले, विरोधक जर सातारा जिल्ह्यात आले, तर त्यांना बंदला प्रतिसाद आहे की नाही हे कळेल. सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी १०० टक्के बंद पाळला आहे. विरोधकांना केवळ महाविकास आघाडीवर टीका करणे, महाविकास आघाडीने एखादा विषय हातात घेतला की तो कशा पध्दतीने हाणून पाडता येईल एवढेच पाहतात. विरोधकांचा त्याला विरोध असेल, तर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जो महाराष्ट्रातील जनतेने बंदला पाठिंबा दिला आहे, तो त्यांना मान्य नाही, असाच त्याचा अर्थ काढावा लागेल.

हेही वाचा: सातारा, कऱ्हाड, वाई, वडूज, खटावात बंदला प्रतिसाद; योगींविरोधात घोषणाबाजी

खुर्च्या आपटल्याची दखल घेणार

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यस्तरावरुन शांततेत बंद करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांना त्याच्या सूचना दिल्या होत्या. साताऱ्यामध्ये खुर्च्या आपटण्याचा प्रकार झाला आहे. त्याला स्थानिक अधिकाऱ्यांनी मज्जाव केला आहे. कायदा व सुव्यवस्था कोणीही हाती घेवून नये, अशा सूचना महाविकास आघाडीने केल्या होत्या. मात्र, तरीही असा प्रकार घडला असेल, तर त्याची माहिती घेवून योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिला.

loading image
go to top