Koyna Reservoir Renamed : आता कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पाहा काय आहे GR?

Chhatrapati Shivaji Maharaj Koyna Reservoir : राज्य शासनाने कोयना जलसागराचे नामांतर करून त्याला 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' हे नाव दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर शासन निर्णय जारी करण्यात आला.
Koyna Reservoir renamed by Maharashtra Government

Koyna Reservoir renamed by Maharashtra Government

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : पश्चिम महाराष्ट्राच्या जलसिंचन, वीजनिर्मिती आणि पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या कोयना जलसागराचे नामांतर करून त्यास 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com