

Dr Neeraj Hatekar speaks on long-term solutions to drought at a programme in Khatav.
esakal
खटाव, : दुष्काळाची समस्या केवळ पावसाच्या अभावापुरती मर्यादित नाही. त्यामागे सिंचनातील त्रुटी, पाण्याचे अयोग्य नियोजन, अपव्यय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील असमतोल अशीही कारणे आहेत. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी केले.
माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘दुष्काळातून सावरण्यासाठी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.