Koyna Dam water level today
esakal
कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने (Koyna Dam Water Storage Reaches) उघडून ५,०७९ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरणात सध्या 83.95 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.