Koyna Dam latest water storage update
esakal
कराड (जि. सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर, कोयनानगर, नवजा परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली असून पावसाचा जोर कमी झाला (Koyna Dam storage latest update) आहे. अधून-मधून मुसळधार सरी कोसळत आहेत. कोयना धरणात 24 तासांत 3.02 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून धरणात सध्या 70.88 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.