

‘Accident Monday’ Turns Deadly; 14 Killed in Ambenali Ghat and Dhule Highway Mishaps
sakal
महाबळेश्वर/पोलादपूर: रायगड व सातारा जिल्ह्यांना जाेडणाऱ्या पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. दापाेलीहून साताऱ्याकडे परतीचा प्रवास करताना पर्यटकांची मोटार १२०० फूट खाेल दरीत कोसळली. या अपघाताची माहिती २४ तासांनंतर उघडकीस आली. दांभील गावाजवळ झालेल्या या दुर्दैवी अपघातातील मृत सातारा तालुक्यातील आसगाव, मर्ढे तसेच खटावमधील आहेत.
या अपघातात रितेश लोखंडे (वय २२), सुहास लोखंडे (वय २०), महेश पवार (वय २५), आदित्य साळुंखे (वय २१), करण शिंगटे (वय २१), निखिल शिंगटे (वय २५), संदीप काटकर (वय ३७) तसेच अंश चव्हाण (वय १९) यांचा मृत्यू झाला आहे.