पुण्यातील सातारकरांसाठी एसटीची खूषखबर

पुण्यातील सातारकरांसाठी एसटीची खूषखबर
Updated on

सातारा  : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाउनच्या काळात वाहतूक व्यवस्था ठप्प होती. जुलै महिन्यानंतर काही प्रमाणात एसटी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांअभावी फेऱ्यांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात सातारा- स्वारगेट मार्गावर विनावाहक बस दिवसभरात केवळ 12 ते 15 फेऱ्या सुरू होत्या; परंतु मागील दहा दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढल्याने दर 30 मिनिटांनी सातारा-स्वारगेट मार्गावर बस सोडली जात असल्याचे एसटी विभागाने सांगितले आहे.
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात लॉकडाउनच्या काळात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक सुरू होऊनही प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे फेऱ्या कमी ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना संसर्ग येणापूर्वी सातारा- स्वारगेट मार्गावर सुमारे 35 फेऱ्या सुरू होत्या. मात्र, लॉकडाउननंतर केवळ दहा ते बारा फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या. एसटीच्या कमी फेऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुण्याला जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने दर 30 मिनिटांनी बस सुरू करण्यात आली आहे.

खंबीर मराठा सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, उदयनराजेंचा रोखठोक इशारा
 
सातारा- बोरिवली मार्गावरही बसच्या फेऱ्या दर दोन तासांनी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या पाहता या मार्गावर दर एक तासाला एसटी बस सोडली जात असल्याचे एसटी विभागाने सांगितले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahendra Crowned Hind Kesari as Pune’s Prithviraj Finishes Runner-Up
Political Buzz Intensifies in Karad as Krishna Sugar Factory Election Process Begins
Satara Municipal Politics Heats Up as Shivendrasinhraje Calls for Unity and Discipline
Studied at Night, Helped Family by Day; Fatima Khan’s Inspiring Success Story
Marathi News Esakal
www.esakal.com