Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका
Indians Rescued : इराण–इस्त्रायल संघर्षामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा फटका महाराष्ट्रातील काही नागरिकांनाही बसला. विमा क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी दुबईला गेलेल्या सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २६ जणांचा गट अचानक उड्डाणे बंद झाल्याने काही दिवस दुबईत अडकून पडला.
कऱ्हाड ः बॉम्ब, मिसाईल हल्ल्याचे आवाज, मनात माजणारे भितीचे काहुर अन् उडणारा थरकाप, घरी परतण्याची ओढ अशा तणावपुर्ण अवस्थेत आम्ही दुबईतील एका हॉटेलमध्ये पाच-सहा दिवस कंठत होतो.