
लोणंद : पाडेगाव (ता. खंडाळा) गावचे सुपुत्र व लोणंद रनर्स ग्रुप व भैरवनाथ डोंगर ग्रुपचे क्रियाशील सदस्य संतोष मल्हारी कोकरे यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरातील ९० किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन १० तास ३३ मिनिटांत पार करून कांस्यपदक पटकावले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.