
-सलिम चोपदार
म्हसवड : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेले येथील श्री सिद्धनाथ देवस्थान मंदिराच्या मूर्तीखालील भुयारातील स्वयंभू शिवलिंग महाशिवरात्रीनिमित्त वर्षातून एकदाच भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. यंदा बुधवारी (ता. २६) महाशिवरात्रीनिमित्त हे भुयार भाविकांना दर्शनासाठी रात्री दहा वाजता खुले केले जाणार आहे, अशी माहिती सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वैभव गुरव, उपाध्यक्ष रवीकिरण गुरव व सचिव दिलीप कीर्तन -गुरव यांनी दिली.