- उमेश बांबरे
सातारा : थकबाकीमुळे हैराण झालेल्या महावितरण कंपनीने आता वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या ३५ दिवसांत तब्बल ५१ हजारांवर थकबाकीदारांची कनेक्शन तोडली आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १९२० घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांची कनेक्शन तोडली आहेत. काही ग्राहकांकडून कनेक्शन तोडल्यानंतरही चोरून विजेचा वापर केला जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ग्राहकांनी विजेचे बिल वेळेत भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.