
-रविकांत बेलोशे
भोसे : जावळी तालुक्यातील महू धरण बाधित प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २० फेब्रुवारीला धरणावर आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आमदार शशिकांत शिंदे पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित, महू यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.