Minister Makrand Patilsakal
सातारा
Makarand Patil : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी ठेवावी : मंत्री मकरंद पाटील
शिवजयंतीनिमित्त येत्या १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत अजित पर्व अंतर्गत शिवजयंती सप्ताह, स्वच्छता अभियान, मराठी भाषेचा विकास असे कार्यक्रम होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आपल्याला हे दिवस दिसत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने आपल्या पक्षाचे काम सुरू आहे.
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच जिल्ह्याचा विकास झाला असून, त्यांना मानणारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकवर आहे. आता आगामी निवडणुकीतही आपल्याला हे स्थान कायम ठेवायचे आहे. काही पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही स्वबळाची तयारी ठेवावी, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ झाला असून, सर्वांनी यामध्ये झोकून काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
