Malkapur News: आई गेली... बाबा दुरावला; कोण आधार चिमुरड्यांचा? रात्रीत हरपले आई-वडिलांचे छत्र; चौथी, दुसरीतील भावंडांसमोर भवितव्‍याचा प्रश्‍न

Two Siblings Face Uncertain Future After Family Tragedy: मलकापूरमधील कौटुंबिक घटनेनंतर चौथी आणि दुसरीत शिकणाऱ्या दोन भावंडांच्या आयुष्यावर मोठे संकट आले आहे.
Malkapur News

Malkapur News

esakal

Updated on

राजेंद्र ननावरे: सकाळ वृत्तसेवा मलकापूर, ता. ११ : काल- परवापर्यंत आईच्या मायेच्या कुशीत अन् वडिलांच्या आधाराने वाढणाऱ्या दोन चिमुरड्यांच्या आयुष्यात एका रात्रीत काळोख पसरला. चौथीत शिकणारा मुलगा आणि दुसरीत शिकणारी त्याची बहीण पोरकी झाली, त्यांची आई रोहिणी जांभळे यांचा दुर्दैवी अंत झाला, तर पत्नीच्या खुनात वडील दत्तात्रय पोलिसांच्या ताब्यात गेल्‍याने दोन्ही मुलांच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र एकाच रात्री हरपले. त्यांचा सांभाळ अन् शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार आणि त्यांच्या भविष्याला आधार कोण देणार? हा प्रश्‍न मात्र आजतरी आव्‍हानात्‍मक बनून पुढे आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com