विषय समित्यांच्या निवडीतून मलकापूर शहराचा भौगोलिक समतोल साधला : मनोहर शिंदे

राजेंद्र ननावरे
Wednesday, 7 October 2020

पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांच्या निवडी झाल्या.

मलकापूर (जि. सातारा) - येथील पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विशेष बैठकीत पार पडल्या. पाणीपुरवठा मनोहर शिंदे, बांधकाम राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण प्रशांत चांदे, तर महिला व बालकल्याण शकुंतला शिंगण यांची सभापतिपदी निवड झाली. पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांच्या निवडी झाल्या. पाणीपुरवठा सभापतिपदी शिंदे व बांधकाम सभापतिपदी यादव यांची पुन्हा वर्णी लागली आहे. नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे उपस्थित होत्या.
 
येथील पालिकेच्या विषय समित्यांची निवडी करण्यात आल्या. पाणीपुरवठा, स्वच्छता व जलनिःस्सारण समितीच्या सभापतिपदी उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांची निवड झाली असून, अलका जगदाळे, पूजा चव्हाण, माधुरी पवार, दिनेश रैनाक यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. बांधकाम समितीच्या सभापतिपदी प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक राजेंद्र यादव यांची निवड झाली असून, या समितीमध्ये गीतांजली पाटील, कमलताई कुराडे, सागर जाधव, नूरजहॉं मुल्ला यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नियोजन, विकास व शिक्षण समितीच्या सभापतिपदी प्रभाग क्रमांक एक नगरसेवक प्रशांत चांदे यांची निवड झाली आहे. सदस्यपदी आनंदी शिंदे, किशोर येडगे, आनंदराव सुतार, निर्मला काशीद यांची निवड झाली आहे.

सेंट झेविअर्स सुरुच हाेती ? शिक्षण विभागाच्या अहवाल गुलदस्त्यात

महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी प्रभाग सहाच्या नगरसेविका शकुंतला शिंगण यांची निवड झाली असून, स्वाती तुपे, भारती पाटील, नंदा भोसले, भास्कर सोळवंडे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. निवडीनंतर बोलताना उपाध्यक्ष शिंदे म्हणाले,"" विषय समित्यांची निवड करताना शहराचा भौगोलिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. विषय समित्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवताना निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यावर भर राहील.''

मुलीच्या नावाने उघडा खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख
 
दरम्यान, भाजपच्या वतीने महिला व बालकल्याण सभापतिसाठी भास्कर सोळवंडे, बांधकाम सभापतिसाठी नूरजहॉं मुल्ला, पाणीपुरवठ्यासाठी दिनेश रैनाक व नियोजन व शिक्षण सभापतिपदासाठी निर्मला काशीद यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malkapur Muncipal Council Election Satara News