Satara News : मलवडीच्या राहुल जगदाळेंची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
राहुल यांनी नुकतीच ‘बॉर्डर हेल रेस’ ही शंभर किलोमीटरची मॅरेथॉन १३ तास ३५ मिनिटांत पूर्ण केली, तसेच त्यांनी अनेक लांब पल्ल्याच्या व कठीण मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.
Rahul Jagdale registered India Book of RecordsSakal
दहिवडी : आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू, एनडीआरएफमध्ये हवालदार या पदावर कार्यरत असलेले माण तालुक्यातील मलवडीचे सुपुत्र राहुल हरी जगदाळे यांच्या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.