
मसूर: नवीन कवठे (ता. कऱ्हाड) येथे महिन्यापूर्वी दिलेल्या तक्रारीच्या कारणावरून सावत्र भाऊ व भावजयने दगडाने व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची तक्रार येथील पोलिसात दाखल झाली. गुरुवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सावत्र भाऊ लखन उत्तम जाधव व त्याची पत्नी रेश्मा ऊर्फ माधुरी जाधव (दोघेही रा. नवीन कवठे) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. मच्छिंद्र उत्तम जाधव (वय ३५) हे या मारहाणीत जखमी झाले आहेत.