
दहिवडी : माण विधानसभा मतदारसंघात एकूण एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी भाजपचे जयकुमार गोरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांच्यात काट्याची टक्कर आहे. त्याचाच प्रत्यय आज मतदानासाठी लागलेल्या चढाओढीतून पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचा परिणाम म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानात मोठी वाढ झाली.