
मांढरगडावर व परिसरात काळूबाई यात्रेच्या निमित्ताने पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक, दहा उपनिरीक्षक, 87 पुरुष, महिला व वाहतूक पोलिस कर्मचारी, 24 होमगार्ड, एक दंगाकाबू पथक, एक जलदकृती दलाची तुकडी असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता.वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आजपासून (गुरुवार) सुरू झाली. यात्रेच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने मंदिरावर आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली असून, मंदिर परिसरात जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मांढरगड सुना सुना पडला आहे.
महिनाभर मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी याठिकाणी भाविकांची वर्दळ असते. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून यावर्षी काळूबाईची यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण पौष महिना म्हणजेच 14 फेब्रुवारीपर्यंत काळूबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ यात्रेच्या मुख्य दिवशी देवीची विधिवत पूजा व महाआरती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व निवडक पुजारी यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू असून या परिसरात गर्दी होऊ नये याची दक्षता पोलिस व प्रशासन घेत आहे.
भाविकांनाे.. काळूबाईला येताय, थांबा! मंदिर राहणार महिनाभर बंद
आज पौष पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक न्या. आर. डी. सावंत यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा झाली. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन न्या. एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त ऍड. महेश कुलकर्णी, ऍड. मिलिंद ओक, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, शैलेश क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, राजगुरू कोचळे, सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित हाेते. यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मांढरगडावर व परिसरात काळूबाई यात्रेच्या निमित्ताने पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक, दहा उपनिरीक्षक, 87 पुरुष, महिला व वाहतूक पोलिस कर्मचारी, 24 होमगार्ड, एक दंगाकाबू पथक, एक जलदकृती दलाची तुकडी असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भारीच! चार तासात पार केले 72 किलोमीटरचे सायकलिंग; प्राथमिक शिक्षिकेच्या तंदुरुस्तीचे सर्वत्र कौतुक
औंधमध्ये जमावबंदी; यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
कोविड योद्ध्यांच्या गौरवार्थ माजी सैनिकाची सातारा ते रहिमतपूर धाव
वाटाघाटीने मार्ग निघत नसेल, तर लोहमार्गासाठी जमिनी सक्तीने ताब्यात घ्या; खासदारांचे सक्त आदेश
Edited By : Siddharth Latkar