
मसूर : यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्रात सर्वसामान्य माणसाला संधी मिळावी आणि सत्ता विकेंद्रित व्हावी, हा विचार मांडला. मात्र, विद्यमान चेअरमन यांनी त्याच्या विपरीत कार्य करत सत्ता स्वतःच्या एका कुटुंबापुरती मर्यादित ठेवली आहे. कारखान्याचे चेअरमन, गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन आणि इतर संस्थांचे चेअरमन हे एकाच घरातील असल्याने सहकाराचा मूलभूत हेतूच हरवला आहे, अशी टीका घोरपडे यांनी केली.