लक्षात ठेवा; मराठा समाज डाेक्यावर घेऊन नाचताे किंवा चपलेखालीही घेताे

लक्षात ठेवा; मराठा समाज डाेक्यावर घेऊन नाचताे किंवा चपलेखालीही घेताे

सातारा : सत्ताधा-यांनाे सत्तेचा माज करु नका तुम्ही कितीही झालात तरी कधीही काही हाेऊ शकतं मराठा समाज अथवा का काेणताही समाज जेवढं तुम्हांला डाेक्यावर घेऊन नाचताे तेवढंच चपलाखाली घेऊन तुडवताे. त्यामुळे राजकारण्याच्या पलीकडे समाज आणि जात असल्याचे विसरु नका. महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी राजकीय झूल बाजूला ठेऊन मराठा समाजासाठी एकत्र यावे असे आवाहन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले.

(कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने सातारा जिल्ह्यात विकास फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. त्याचे उदघाटन येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी खासदार उदयनराजे भाेसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, ज्येष्ठ नेते दिलीप येळगावकर आदी उपस्थित आहेत. प्रारंभी नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना बराेबर घेऊन राज्य कारभार चालविला. त्यांच्या प्रेरणेनेच मी सातारा येथे फाऊंडेशनचे काम करण्यास प्रारंभ करीत आहे. उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे तसेच संभाजीराजे या तिन्ही राजेंनी एकत्र यावे असे मराठा समाजाला कायम वाटत असते. माझी देखील हीच तळमऴ आहे. यासाठीच मराठ्यांच्या राजधानीत तिघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार उदयनराजेंनी मराठा समाजासाेबत असल्याचे वेळाेवेळी ठणकावून सांगितले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि खासदार संभाजीराजे हे देखील समाजासाठी झटत आहेत. 

रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादवांनी हेच केले हाेते; कऱ्हाडात चर्चा

नरेंद्र पाटील म्हणाले माझा जन्म पाटण तालुक्‍यातील मंद्रुळकोळे या छोट्याशा गावात गरीब शेतकरी कुटुंबात झाला. माझे वडील अण्णासाहेबांनी मुंबईत उसाच्या घाण्यावर काम केले आणि त्यानंतर लाकडाच्या वखारीत मजूर म्हणून नोकरी पत्करली. त्याकाळी कामगारांची मालकांकडून होणारी पिळवणूक सहन न झाल्याने तेथील कामगारांना एकत्र केले. याबराेबरच साताऱ्याच्या मातीतल्या अण्णासाहेबांनी कष्टकऱ्यांच्या मनामनात आपल्या हक्कांसाठी अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रज्वलित केलेली ठिणगी पुढे मशाल बनली आणि तिच्या तेजात कष्टकऱ्यांचे जीवन उजळून निघाले. अण्णासाहेब हे केवळ माथाडी कामगारांचे नेते नव्हते तर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. सन 1980 मध्ये त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली. आर्थिक निकषावर आरक्षणासाठी 22 मार्च 1982 रोजी त्यांनी भव्य मोर्चा काढला होता. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही, असे त्यावेळी ठणकावून सांगणाऱ्या अण्णासाहेबांनी दुसऱ्या दिवशी पहाटे स्वतःचे जीवन संपवले.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधा-यांनी काय केले आहे हे आपण सर्वजण पाहतच आहात. खरं तर राजकीय झूल बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहनही पाटील यांनी केले.

काळूबाईच्या नावानं चांगभलं; थांबा! कूठे निघालात? मांढरगडावर... अहाे हे वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com