
-राजेश पाटील
ढेबेवाडी : मराठवाडी धरणातून विसर्ग थांबविल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच वांग नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे पडले आहेत. धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांपुढे गव्हासह अन्य बागायती पिके जगवायची कशी? असा प्रश्न आहे. बंधाऱ्यांना असलेल्या गळतीमुळेही पाणीसाठा टिकून राहात नसल्याच्या तक्रारी आहेत.