
कवठे : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कवठे (ता. वाई) येथील वीरमरण आलेल्या पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले.