मंडलाधिकारी, तलाठ्यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; 25 जणांवर गुन्हा

मंडलाधिकारी, तलाठ्यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; 25 जणांवर गुन्हा
Updated on

म्हसवड (जि. सातारा) : अवैध वाळू वाहतूक करीत असलेल्या पिकअप वाहनावर कारवाई करत असलेले मंडलाधिकारी शरद सानप, सिद्धार्थ जावीर यांना जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना ढाकणी येथे घडली. या प्रकरणी पळशी (ता. माण) येथील 25 जणांविरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
 
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती माहिती अशी, गुरुवार रात्री तहसीलदार बी. एस. माने यांच्या आदेशानुसार तालुक्‍यातील भरारी पथक ढाकणी-पानवन रस्त्यालगत वाहनामधून अवैध वाळू वाहतूक करत असलेली माहिती भरारी पथकातील मार्डीचे मंडलाधिकारी शरद दादासाहेब सानप, शिंगणापूरचे मंडलाधिकारी सिद्धार्थ जावीर, गोंदवले बुद्रुक मंडलाधिकारी भरत कर्णे व दहिवडचे तलाठी श्‍याम सूर्यवंशी यांना मिळताच हे सर्व जण रात्री साडेनऊ वाजता ढाकणी येथे आले व अवैध वाळू वाहतूक करत असलेले पिकअप वाहन पकडले.

भाजप हटाव, देश बचाव

यानंतर वाहनाचा चालक रवी राजेंद्र खाडे हा वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना सहा हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाहतूक करत होता. म्हणून चालकास वाहन म्हसवड पोलिस ठाण्यात घेऊन चल, असे सांगितले असता त्याने जवळच्या मोबाईलवरून संपर्क करताच लगेच सहा- सात मोटारसायकलीवरून 20 -25 जण घटनास्थळी जमा झाले. त्यांनी वाहन पुढे पोलिस ठाण्यात घेऊन जायचे नाही, असे म्हणून भरारी पथकातील मंडलाधिकारी यांना मोठमोठ्याने शिवीगाळ व दमदाटी करून चालक रवी राजेंद्र खाडे व इतर जमावाने भरारी पथकातील मंडलाधिकारी व तलाठी यांना हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

सातारा : दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत असल्याचा मी पुरावा देऊ शकतो

या वेळी जमावाने शासकीय कामात अडथळा आणून भरारी पथकातील महसूल विभागाचे कोण कोण आले आहे. त्यांना शोधून मारा. आज त्यांना येथून जाऊ देऊ नका. असा आरडाओरडा करत पुन्हा मारहाण केली. वाहन पळवून घेऊन पसार झाले. 
शासकीय कामात अडथळा आणून मंडलाधिकारी व तलाठी यांना मारहाण करून वाहन पळवून नेल्याप्रकरणी पळशी येथील रवी राजेंद्र खाडे व इतर 20-25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकले करत आहेत. 

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com